Department of History


Dr. V. G. Somkuwar
Head of the Department

Introduction-इतिहास विभाग :
गजमल तुळशीराम पाटील महाविद्यालयाची स्थापना इ.स. १९६४ मध्ये झाली. त्याचवेळी इतिहास हा विषय पदवी स्तरावर सुरु होऊन पुढे विद्यार्थीसंख्या वाढून १९७२ पासून इतिहासाचे पदव्युत्तर वर्ग सुरु झाले. संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात तत्कालीन आणि आजच्या ही काळात एकमेव अनुदानित विभाग आहे. आजच्या स्थितीत विभागाचे स्वतंत्र संशोधन विभाग आहे. त्यामाध्यमातून इतिहास विषयातील विविध घटकांवर संशोधन करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना संशोधनाची संधी उपलब्ध झाली असून आजच्या स्थितीत एकूण ०८ विद्यार्थी पीएच. डी. च्या माध्यमातून संशोधन करीत आहेत. या विभागात दरवर्षी जवळपास १२०० विद्यार्थी इतिहासातील विविध घटकाचे शिक्षण घेतात. इतिहास विषय महाविद्यालयाचा आत्मा असून या विभातील सर्व प्राध्यापक उच्च विद्याविभूषित आहेत

 • • ग्रामीण आणि आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये प्रादेशिक इतिहासाची गोडी निर्माण करणे.
 • • विपरीत परिस्थितीतही स्वराज्य आणि योग्य मानवाची, समाजाची निर्मिती कशी करावी याचे ज्ञान देणे.
 • • अगदी प्राचीन काळापासून तर आधुनिक काळापर्यंत समाजाची निर्मिती, मानवाच्या विकासाची, जगातील घडामोडींच्या परिणामांची माहिती विद्यार्थ्यांना करून देणे.
 • • देश, समाज, गुलामीत जाण्याची कारणे, गुलामीतून बाहेर येण्याच्या संघर्शाची माहिती विद्यार्थ्यांना करून देणे.
 • • इतिहासातील विविध समाजसुधारक – महापुरुषांच्या जयंती – पुण्यतिथीला व्याख्यानाचे आयोजन.
 • • शिवजयंती निमित्त ऐतिहासिक वेशभूषा करून शोभायात्रेचे आयोजन करणे.
 • • विविध ऐतिहासिक स्थळांना भेटी देवून, पर्यटनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संशोधनाची माहिती देणे.
 • • विविध स्पर्धा परीक्षेतील इतिहास विषयाचे महत्व याबाबतचे व्याख्यान आयोजित.
 • • इतिहास विषयाचे अध्ययन करून बाहेर पडलेले विद्यार्थी पार्टन स्थळी मार्गदर्शक म्हणून कार्यरत.
 • • बरेच विद्यार्थी नेट, सेट परीक्षेत उत्तीर्ण
 • • अनेक विद्यार्थी प्रशासकीय सेवेत विविध पदांवर कार्यरत
 • • इतिहास विषयाच्या अध्ययनानंतर चित्रपट निर्मिती करण्यास वाव.
 • • भारतीय पुरातत्व विभाग, पर्यटन स्थळी काम करण्यास संधी.
 • • भारतीय सर्वेक्षण विभागात काम करण्याची संधी.
 • • स्पर्धा परीक्षेत इतिहास विषय घेवून अधिकारी बनण्याची संधी.
 • • गड किल्ले जतन व संवर्धन विभागात काम करण्याची संधी.

STAFF LIST


Sr.No. Name of Teacher Designation Qualification Attachment
1 Dr. V. G. Somkuwar Assistant Professor M.A., B.Ed., NET., Ph.D.,
CV
2 Mr. B. S. Samudre Assistant Professor M.A.
CV
3 Dr. N. B. Shende Assistant Professor M.A., SET, Ph.D.,
CV
4 Dr. V. V. Patil Assistant Professor M.A., B.Ed., NET., SET., Ph.D.
CV